नवी मुंबई : लोकनेते गणेश नाईक यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या जीवनधारा नवी मुंबई वॉर्ड सल्लागार समिती-पर्यावरण व वनीकरण तसेच ग्रीन होप यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षीप्रमाणे यंदाही शुक्रवार ५ जून रोजी जागतिक पर्यावरण दिनापासून वृक्षारोपण मोहीम-२०१५ राबविण्यात येणार आहे. बेलापूर आणि ऐरोली बेलापूर आणि ऐरोली विधानसभा मतदारसंघात विविध मान्यवर, लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत या मोहिमेचा शुभारंभ होणार आहे, अशी माहिती ग्रीन होप संस्थेचे अध्यक्ष आ.संदीप नाईक यांनी दिली.
शुक्रवार ५ जून रोजी सकाळी ९ वाजता ऐरोली मतदारसंघातील ऐरोली सेक्टर-१५ येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर भवनाच्या लगतच्या मैदानात आणि सीबीडी, बेलापूर मतदार संघातील एन.आर.आय.कॉम्लेक्स सेक्टर-५४ नेरुळ सेक्टर-५४ नेरुळ येथे या दोन्ही सेक्टर-५४ नेरुळ ठिकाणी वृक्षारोपण मोहीम-२०१५ चा शुभारंभ करण्यात येणार आहे.
याप्रसंगी संजीव नाईक, संस्थेचे अध्यक्ष आ.संदीप नाईक, माजी महापौर सागर नाईक, श्रमिक शिक्षण संस्थेचे सचिव सुरेश नाईक, नवी मुंबई महानगरपालिकेतील नगरसेवक, पदाधिकारी, नवी मुंबई वॉर्ड सल्लागार समितीच्या पर्यावरण आणि वनीकरण समितीचे सदस्य आणि वृक्षप्रेमी नागरिक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. त्याचबरोबर वृक्षारोपण मोहिमेदरम्यान पर्यावरण रक्षणाचा संदेश देणार्या ङ्गलकांच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येणार आहेत. मोहिमेदरम्यान पर्यावरण रक्षणाचा संदेश देणार्या ङ्गलकांच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येणार आहेत.
२००८ साली ग्रीन होपने एक लाख झाडे लावण्याची मोहीम हाती घेतली होती. या मोहिमेत सुमारे २० हजार नागरिकांनी उत्स्ङ्गूर्त सहभाग नोंदविला होता. २००९ साली दोन लाख झाडे लावण्याची मोहीम पार पडली. खारङ्गुटींचे रोपण हे त्यावर्षीच्या मोहिमेचे वैशिष्ठ्य ठरले. पाच ठिकाणी वृक्षारोपण केंद्रे उघडून रोपटयांचे मोङ्गत वाटप करण्यात आले होते. २०१० साली वृक्षारोपणाबरोबरच शहरात स्वच्छता अभियानही राबविण्यात आले होते. त्यावर्षी दोन लाख तुळशींचे मोङ्गत वाटपही नागरिकांना करण्यात आले होते. तसेच ‘स्वच्छ हरित नवी मुंबई आणि पर्यावरण संवर्धन’ या विषयांवर आधारित चित्रकला, घोषवाक्य, छायाचित्र, लेखन आणि निबंध अशा स्पर्धाही घेण्यात आल्या होत्या. नागरिक आणि विद्यार्थी मिळून दोन हजार स्पर्धकांनी यात भाग घेतला होता. या स्पर्धेतील उल्लेखनीय चित्रांचे आणि छायाचित्रांचे प्रदर्शन वाशी येथील शिवाजी चौकात भरविण्यात आले होते. या स्पधारचा बक्षीस समारंभ ग्रीन मिशन २०११ अंतर्गत थाटामाटात करण्यात आला होता. २०१२ मध्ये पर्यावरणाचा संदेश शहरातील प्रभागा -प्रभागांत पोहोचविण्यासाठी प्रभाग स्तरावर वृक्षारोपणाची मोहीम राबविण्यात आली होती. या मोहिमेत जीवनधारा नवी मुंबई वॉर्ड सल्लागार समिती- पर्यावरण व वनीकरण तसेच ग्रीन होपच्या सदस्यांनी आणि पर्यावरणप्रेमी नागरिकांनी मोठ्या संख्येने भाग घेतला होता.तर सन २०१३-२०१४ या कालावधीत १ लाखाहून अधिक वृक्षांची लागवड जीवनधारा आणि ग्रीन होपच्या माध्यमातून करण्यात आली आहे.
झाडांचे केवळ रोपण करुन ग्रीन होप आपले कार्य संपले असे मानत नाही तर ही झाडे जगविण्यासाठी नियोजनबध्द कार्यक्रम राबविते. शाळा, महाविद्यालये, गृहनिर्माण संस्था, कारखाने, डोंगर, सार्वजनिक ठिकाणे आदी सर्व ठिकाणी वृक्षारोपण करण्यात येते. त्या-त्या ठिकाणी आवश्यक असणारी झाडे लावली जातात. डोंगरावर मातीची धूप थांबविणारी तर रस्ते, शाळा, महाविद्यालये या ठिकाणी शीतल छाया देणारी तसेच शोभेची झाडे लावली जातात. खाडीकिनारी सागरी जीवसृष्टीसाठी संजीवनी ठरणार्या आणि पुरापासून परिसराचे संरक्षण करणार्या खारङ्गुटींच्या झाडांचे रोपण करण्यात येते. नवी मुंबईत मोठा औद्योगिक पट्टा आहे. या औद्योगिक क्षेत्रातही मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण मोहीम हाती घेण्यात येते. जेणेकरुन येथील प्रदूषणावर नियंत्रण मिळविता येईल.
******
लोकनेते गणेश नाईक यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या जीवनधारा नवी मुंबई वॉर्ड सल्लागार समिती-पर्यावरण व वनीकरण तसेच जीवनधाराच्या इतर वॉर्ड सल्लागार समित्या आणि ग्रीन होप संस्थेच्या माध्यमातून वृक्षारोपणाची चळवळ शहरातील प्रत्येक प्रभागात आणि घराघरापर्यत पोहोचविण्याचा आमचा प्रयत्न आहे. नवी मुंबईकरांना जास्तीत जास्त मोकळा आणि शुध्द श्वास कसा घेता येईल, यासाठी ही वृक्षारोपणाची मोहीम मागील अनेक वर्षांपासून एक जीवनदायी ठरली आहे. यंदा देखील वृक्षारोपण मोहीम- २०१५ च्या माध्यमातून १ लाख वृक्षांचे रोपण करुन नवी मुंबईला हरित करण्याचा संकल्प हाती घेण्यात आला असून नागरिक मोठ्या संख्येने या विधायक उपक्रमात सहभागी होतील, असा मला विश्वास आहे.
-आ.संदीप नाईक,
अध्यक्ष – ग्रीन होप
******
ग्रीन होपच्यावतीने वृक्षरोपे वाटप केंद्रातून नागरिकांना मोङ्गत रोपट्यांचे वाटप केले जाणार आहे. नागरिकांनी मोफत ग्रीन होपच्यावतीने वृक्षरोपे वाटप केंद्रातून नागरिकांना मोङ्गत रोपटयांचे वाटप केले जाणार आहे. नागरिकांनी मोफत वृक्षरोपांसाठी ७७१८८८१६२६ आणि ९९८७३३८७०२ येथे संपर्क साधण्याचे आवाहन ग्रीन होप संस्थेच्यावतीने वृक्षरोपांसाठी ७७१८८८१६२६ आणि ९९८७३३८७०२ येथे संपर्क साधण्याचे आवाहन ग्रीन होप संस्थेच्यावतीने वृक्षरोपांसाठी ७७१८८८१६२६ आणि ९९८७३३८७०२ येथे संपर्क साधण्याचे आवाहन ग्रीन होप संस्थेच्यावतीने करण्यात आले आहे. काजू, रेन-ट्री, जांभुळ, बोर, चिंच, फणस, पेरु, फिकस, बेंजामिन, शंकासूर, सप्तश्री, करण्यात आले आहे.काजू, रेन- ट्री, जांभुळ, बोर, चिंच, फणस, पेरू, फिकस, बेंजामिन, शंकासूर, सप्तश्री, बदाम, सातविन, सुरू, पेल ट्रोङ्गोरम, ताम्हण, अशोका, पाम या जातीची झाडे वृक्षारोपणादरम्यान लावण्यात येणार बदाम, सातविन, सुरु, पेल ट्रोङ्गोरम, ताम्हण, अशोका, पाम या जातीची झाडे वृक्षारोपणादरम्यान लावण्यात येणार आहेत.