नवी मुंबई : रविवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला . संपर्ण महाराष्ट्रामधून मनसेचे मनसैनिक दादरच्या कृष्णकुंज या राज ठाकरे यांच्या निवासस्थानी पहाटेपासूनच दाखल होण्यास सुरुवात झाली होती . राज ठाकरे यांनी देखील पदाधिकारी आणि मनसैनिकांची भेट घेऊन त्यांच्या शुभेच्छा स्विकारल्या.
नवी मुंबई मनसेने या दिवसाचे औचित्य साधून १० वी व १२ वीच्या गुणवंत विध्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा यावेळी पार पडला . याच कार्यक्रमात आदर्श नवी मुंबईकर व युवा नवी मुंबईकर पुरस्कार वितरण सोहळा ही पार पडला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून मनसेचे सरचिटणीस अनिल शिदोरे, सुलेखनकार अचूत्य पालव,मराठी चित्रपट अभिनेते संतोष जुवेकर उपस्थित होते. सर्व प्रमुख पाहुण्यांनी विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी दहावी आणि बारावीच्या ३०० विद्यार्थ्यांना मेडल, प्रमाणपत्र आणि अभ्यास करावा नेटका या पुस्तकाची प्रत देण्यात आली. या पुस्तकात दहावी, बारावी तसेच बँकिंग, कॅट आणि एमपीएससी, , यूपीएससी या परीक्षांचा अभ्यास कसा करावा याचे मार्गदर्शन करण्यात आले आहे . यावेळी आदर्श मुंबईकर सुभाष पवार, दुर्गादास सावंत, मीरा कुलकर्णी, श्रीहरी पवळे, सुभाष कुलकर्णी, नंदकुमार म्हात्रे या मान्यवरांना देण्यात आला तर युवा मुंबईकर म्हणून योगिनी चौक, संजीवन म्हात्रे, उमेश पवार, चंद्रकांत डावरे, डॉ. मनीष तरडेजा, आशय गजभिये, गौरव देसाई यांचा सन्मान करण्यात आला .
आपण आयुष्याचा महत्वाचा टप्पा पार केल्याचे सांगत विद्यार्थ्यांना शहराध्यक्ष गजानन काळे यांनी शुभेच्छा दिल्या तर असेच विद्यार्थ्यांसाठी आपण येथून पुढेही कार्यक्रम घेत राहू असे आश्वासन दिले. यावेळी उपशहर अध्यक्ष निलेश बाणखेले, विनोद पार्टे, शहर सचिव ऍड.कौस्तुभ मोरे यांच्यासह विलास चव्हाणसर, विभाग अध्यक्ष मंदार मोरे, नितीन चव्हाण, सचिन कदम, दीपक अनाजे, अनिल कुरकुटे, विनय कांबळे हे ही उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विलास चव्हाणसर यांनी केले. शाखा अध्यक्ष , उपविभाग अध्यक्ष आणि कार्यकर्त्यांनी यांनी ह्या कार्यक्रमासाठी विशेष मेहनत घेतली.