नवी मुंबई : शिवसेनेच्या सुवर्णमहोत्सवाचे आयोजन साधत शिरवणे गाव शिवसेना शाखा व शिवसेनेचे स्थानिक नगरसेवक ज्ञानेश्वर सुतार यांच्या संयुक्त विद्यमाने ज्येष्ठ नागरिकांना नुकतेच मोफत छत्री वाटप करण्यात आले.
यावेळी नगरसेवक ज्ञानेश्वर सुतार यांच्यासह शिवसेनेचे स्थानिक भागातील सर्व पदाधिकारी उपस्थित होते. शिरवणे भागातील जायंट किलर म्हणून शिवसेनेच्या राजकारणात नगरसेवक ज्ञानेश्वर सुतार यांना ओळखले जात आहे. शिरवणे हा महापालिका स्थापनेपासून राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेेकिल्ला. पण एप्रिल महिन्यात झालेल्या महापालिका निवडणूकीत राष्ट्रवादीच्या गडाला शिवसेनेच्या ज्ञानेश्वर सुतारांनी खिंडार पाडले.