नवी मुंबई : नेरूळ पूर्व प्रभाग ८८मध्ये नवी मुंबई महानगरपालिकेचे सभागृहनेते जयवंत सुतार यांचा नुकताच जाहीर सत्कार करण्यात आला. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या स्थानिक नगरसेविका शशिकला मालादी यांनी या सत्कार सोहळ्याचे आयोजन केले होते.
यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रसचे माजी नगरसेवक सुरेश शेट्टी उपस्थित होते. राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाचे स्थानिक भागातील सर्व पदाधिकारी, रहिवाशी व्यापारी बंधू आणि इतर संघटन मिळून जाहिर सत्काराचे आयोजन करण्यात पुढाकार घेतला होता.
याच कार्यक्रमात राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या माजी नगरसेविका सौ. माधुरी सुतार व जयेंद्र सुतार यांचा सत्कार करण्यात आला. त्याचवेळी स्थानिक नगरसेविका सौ. शशिकला कुमार मालादी यांचाही सत्कार सन्मानीय सभाग्रह नेते जयवंत सुतार यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षातर्फे प्रभागातील विद्यार्थ्यांना शिक्षण प्रोत्साहनासाठी मोठ्या प्रमाणात वह्या वाटप करण्यात आल्या.