नवी मुंबई: जून २०१५-दहा वर्षापूर्वी वयाची साठी उलटलेल्या व्यक्तींमध्ये प्रामुख्याने दिसून येणारा संधिवात हा आजार आता तरुणांमध्येही दिसून येत आहे. गेल्या १० वर्षात तरुणांमध्ये या आजाराचे प्रमाण खूप वाढले आहे. लठ्ठपणा, कमी शारीरिक हालचाली, जेवण आणि झोपण्याच्या अनियमित वेळेमुळे पाठदुखी, सांधे दुखणे, हाडांचा ठिसूळपणा, आमवात अशा संधिवाताच्या आजारांनी आजची तरुण पिढी त्रस्त आहे. अस्थिव्यंग आजारांवर आधुनिक उपचारांसाठी प्रसिद्ध असलेल्या वाशी येथील स्टर्लिंग वोक्हार्ट हॉस्पिटलमध्ये शनिवारी २७ जून रोजी दुपारी १२ ते ४ या वेळेत मोफत बोन मिनरल डेनसिटी व मार्गदर्शन शिबीर आयोजित केले आहे. या शिबिरात मोफत बोन मिनरल डेनसिटी तपासणी मोफत होणार असून जेष्ठ अस्थिव्यंग तज्ञ रुग्णांना मार्गदर्शन करणार आहेत. या शिबिराला येताना रुग्णांनी आपले जुने वैदकीय चाचण्यांचे रिपोर्ट घेवून येणे असे आवाहन वोक्हार्ट हॉस्पिटलतर्फे करण्यात आले आहे. बोन मिनरल डेनसिटी (बीएमडी) या चाचणीतून ओस्टोयोपोरोसिस हा आजार आहे की नाही तसेच हाडांमधील कैलशियमची मात्रा समजण्यास उपयोग होतो. ओस्टियोपोरोसिस (हाडांचा आजार) या समस्येमुळे हाडे कुमकवत होतात आणि त्यांच्या घनतेत घट होत जाते व त्यामुळे शरीराच्या हाडांचा सापळा हा कमजोर होत जातो. शरीरातील कोणत्याही व्याधीवर तात्काळ उपाय करणे फार जरुरीचे असते, परंतु भारतामध्ये आजही ४० टक्के लोक आपले आजारपण आपल्या कुटुंबियांपासून लपवून ठेवतात विशेष करून यामध्ये महिलांचा सहभाग जास्त आहे. ४ ते ५ वर्षे सांधेदुखीचा अथवा गुडघे दुखीचा आजार अंगावर काढल्यानंतर अनेक रुग्णांना महागड्या शस्त्रक्रिया कराव्या लागतात असे मत जेष्ठ अस्थिव्यंग तज्ञ डॉ. शैलेंद्र पाटील यांनी व्यक्त केले.