नवी मुंबई : आमदार संदीप नाईक यांच्या प्रयत्नाने पावणे गाव ते वाशी रेल्वे स्थानक अशी नवी मुंबई परिवहनची बससेवा सोमवारपासून सुरु झाली. आमदार संदीप नाईक यांच्याच हस्ते या बससेवेचा शुभारंभ करण्यात आला. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नगरसेविका मनिषा भोईर यांनी या बससेवेची मागणी केली होती. या बससेवेच्या शुभारंभ प्रसंगी आमदार नाईक यांच्यासह महापौर सुधाकर सोनावणे, स्थायी समितीच्या सभापती नेत्रा शिर्के, नगरसेविका मनिषा भोईर आदी मान्यवर उपस्थित होते. पावणे भागातील सर्व रहिवासी अणि विद्याथ्यारनी या बससेवेचे स्वागत केले आहे तसेच आमदार नाईक यांचे आभार मानले आहेत.