आमदार नरेंद्र पवार यांचा अभिनव उपक्रम
गणेश पोखरकर
कल्याण : ग्लोबल वॉर्मिंगच्या समस्येने हवामानातील होणार्या लाक्षणिक बदलामुळे वातवरण सातत्याने बदलत आहे. एकीकडे कॉक्रीटीकरणाच्या उदयामुळे सर्वत्र गृह्संकुलाची रचना होत असताना पर्यावरण संवर्धन करणार्या वृक्षलागवडीबाबत सर्वत्र उदासीनता दिसते. सदरचे चित्र बदलण्यासाठी भाजपा प्रदेश सचिव आमदार नरेंद्र पवार यांच्या संकल्पनेतून तब्बल 5 हजार वृक्षारोपण करण्याचा अभिनव उपक्रम राबविण्यास कल्याण तालुक्यात सुरुवात करण्यात आली आहे. या उपक्रमाद्वारे वृक्षांची लागवड करून त्याचे उत्तम संगोपन करण्यासाठी पालकत्व करणार्यांना विशेष बक्षीस देखील दिले जाणार आहे. हा अभिनव उपक्रम कल्याण तालुक्यातील शाळा तसेच विविध सामाजिक संस्था येथे यशस्वीपणे राबविण्यात येत आहे.
या अभियाना अंतर्गत नुकतेच तीर्थक्षेत्र टिटवाळा नजीक असलेल्या म्हस्कळ या गावात दोन हजार वृक्षांची लागवड करण्यात आली. या उपक्रमात सर्व ग्रामपंचायतींचे सरपंच, भाजपचे जेष्ठ पदाधिकारी राजाभाऊ पातकर यांसह तीनशे नागरिकांनी सहभाग घेतला. हा वृक्षरोपण उपक्रम भाजपा चे दिवंगत जेष्ठ लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या स्मरणार्थ सुरु करण्यात आला आहे. कल्याण पश्रि्चम मतदार संघातील शाळांमधून व संलग्न ग्रामीण भागातील विद्यार्थी व नागरिकांच्या लोकसहभागातून वृक्ष लागवड करून पर्यावरण साक्षरता हा उपक्रम राबविण्यात येत आहे. विशेष म्हणजे वृक्षरोपण उपक्रमात लहान मुलं, विद्यार्थी, शहरातील मान्यवर, भाजपचे पदाधिकारी यांसह विविध जणांचा सहभाग सक्रियपणे दिसून येत आहे. तसेच या उपक्रमात वृक्ष लागवडी नंतर त्या वृक्षाचे पालकत्व वृक्ष लावणार्यांकडे देण्यात येत आहे. विशेषतः वृक्ष संवर्धन करणार्यांसाठी विशेष बक्षीस व प्रोस्थाहन योजनाही निर्धारित करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे वृक्ष वाढविणार्या व पर्यावरण साक्षरतेसाठी वृक्षारोपण उपक्रम राबाविनार्याना सक्रियतेने या उपक्रमात सहभागी करून घेतले जात आहे.
दरम्यान हा अभिनव उपक्रम भाजपा प्रदेश सचिव आमदार नरेंद्र पवार यांच्या विशेष प्रयत्नाने राबविला जात आहे. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी भाजपाचे ज्येष्ठ पदाधिकारी राजाभाऊ पातकर, जिल्हा अध्यक्षा महिला आघाडी संजीवनी पाटील, महिला जिल्हा सरचिटणीस प्रिया शर्मा, भाजपा शहर अध्यक्ष अर्जुन म्हात्रे, माजी नगरसेवक संदीप गायकर, देवानंद भोईर, भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष गौरव गुजर आदीचे विशेष सहकार्य लाभत आहे.