पनवेल : साध्या सोप्या भाषेत दासबोध ग्रंथाचे निरूपण करून सार्या जगभरात आपले लाखो अनुयायी निर्माण करणारे ज्येष्ठ निरुपणकार नारायण विष्णू तथा नानासाहेब धर्माधिकारी यांच्या स्मृती दिनानिमित्त श्री सदस्यांकडुन वृक्षलागवड आणि संवर्धन अभियान राबवुन त्यांच्या पवित्र स्मृतीस बुधवार, दि. 8 जुलै रोजी अभिवादन करण्यात आले.
साध्या सोप्या भाषेत दासबोध ग्रंथाचे निरूपण करून सार्या जगभरात आपले लाखो अनुयायी निर्माण करणारे महाराष्ट्र भूषण ज्येष्ठ निरुपणकार नारायण विष्णू तथा नानासाहेब धर्माधिकारी यांच्या स्मृती ंंदिनानिमित्त श्री अप्पासाहेब धर्माधिकारी आणि श्री सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाल संपूर्ण महाराष्ट्रभर वृक्षलागवड आणि संवर्धन अभियान राबविण्यात आले. या अभियानांतर्गत पनवेल तालुक्यातील पाले बुद्रुक फणसवाडी येथे पाचशे वृक्षांची लागवड करण्यात आली. यामध्येे फणस, काजू, पिंपळ, चाफा अशा विविध वृक्षांचा समावेश आहे. या अभियानामध्येे पनवेल तालुक्यातील सुमारे तीन हजार श्री दासभक्त सहभागी झाले होते.
पनवेल नगरपषिदच्या वतीनेही ज्येष्ठ निरुपणकार नारायण विष्णू तथा नानासाहेब धर्माधिकारी यांच्या स्मृतीस विनम्र्र अभिवादन करण्यात आले. पनवेल नगरपरिषदेच्या सभागृहात पार पडलेल्या कार्यक्रमात नगराध्यक्षा चारूशीला घरत, उपनगराध्यक्ष मदन कोळी, बांधकाम सभापती मनोहर म्हात्रे, महिला बालकल्याण सभापती संगीता कांडपाल, आरोग्य सभापती गणपत म्हात्रे, नगरसेवक राजू सोनी, प्रथमेेश सोमण, आदिंसह कर्मचारी आणि श्री सदस्यांनी अभिवादन केलेे.