पनवेल : तालुक्यातील गुळसुंदे येथील ज्येष्ठ नागरिक व सामाजिक कार्यकर्ते बाळाराम भाऊ ठोकळ यांचे मंगळवारी अल्पशा आजाराने निधन झाले. मृत्यूसमयी ते 72 वर्षाचे होते.त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, एक मुलगी, सुन, जावई, नातवंडे, असा मोठा परिवार आहे.
प्रेमळ व हसतमुख स्वभाव आणि सामाजिक कार्यात सतत कार्यरत राहिलेले तसेच बृहन्मुंबई महापालिकेत प्रामाणिक सेवा करणारे बाळाराम ठोकळ यांना प्रेमाने अप्पा या नावाने ओळखले जात होते. त्यांच्या पार्थिवावर गुळसुंदे येथील स्मशानभुमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्यविधीस पंचक्रोशीतील सामाजिक, शैक्षणिक, अध्यात्म अशा विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.अप्पांचा दशक्रिया विधी गुरूवार दिनांक 16 जुलै रोजी श्री सिध्देश्वर देवस्थान गुळसुंदे येथे तर उत्तरकार्य रविवार दि.19 जुलैला गुळसुंदे निवासस्थानी होणार आहे.