सुजित शिंदे : 9619197444
नवी मुुंबई : गवळीदेवी आणि सुलाईदेवी ही नवी मुंबईकरांच्या आस्थेची ठिकाणे असून निसर्गाने संपन्न असलेली ही ठिकाणे महाराष्ट्रात आणि भारतात उत्कृष्ट पर्यटनस्थळे म्हणून नावारुपास यावीत, असा मानस महाराष्ट्राच्या राजकारणात नवी मुंबईचे ओबामा म्हणून ओळखल्या जाणार्या आमदार संदीप नाईक यांनी व्यक्त केला आहे. जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून या दोन्ही स्थळांचा पर्यटन स्थळे म्हणून विकास होण्यासाठी आमदार नाईक यांनी यशस्वी प्रयत्न केले असून त्या दृष्टीने प्रक्रीया सुरु झाली आहे.
गवळीदेव आणि सुलाईदेवी या दोन्ही स्थळांचा बुधवार, दि. 8 जुलै रोजी आमदार नाईक यांनी पाहणीदौरा केला. या स्थळांमध्ये पर्यटनाच्या दृष्टीने आवश्यक सुविधा निर्माण व्हाव्यात यासाठी आमदार नाईक यांच्या पाठपुराव्यामुळे नवी मुंबई महापालिकेकडून 2.84 कोटी रुपयांचा निधी मंजुर झालेला आहे. या निधीअंतर्गत विविध सोयी सुविधांची कामे होणार आहेत. त्याचबरोबर आमदार नाईक यांच्या 15लाख रुपयांच्या निधीतून गवळीदेव येथील 1948 सालच्या ब्रिटीश कालिन विहीरीची डागडूजी आणि मजबूतीकरण करण्यात येणार आहे तसेच सुलाईदेवी येथे विद्युत दिवे बसविण्यात येणार आहेत.
सुमारे 100 हेक्टर परिसरात पसरलेल्या गवळीदेव या धार्मिक आणि निसर्गाने नटलेल्या पर्यटनस्थळाची पाहणी आमदार नाईक यांनी केली. वनखात्याचे क्षेत्र अधिकारी इच्छांत कांबळी आणि पालिकेचे कार्यकारी अभियंता शंकर पवार यांना विविध सुचना केल्या.पशु आणि पक्ष्यांना पाणी पिण्यासाठी उपयोगात येणार्या पाण्याचा टँकची दुरुस्ती करुन या टॅकमध्ये सोडलेली पाण्याची पाईपलाईन सडलेली असल्याचे निदर्शनास आल्यावर ती बदलण्याची सुचना त्यांनी केली. या परिसरात कचरा पडू नये यासाठी कचराकुंडया लावाव्यात, स्वच्छतागृहांची सोय करावी, या ठिकाणी मुलांसाठी होणार्या बगिच्यात चांगल्या प्रकारची खेळणी बसवावीत, या बगीच्याच्या कामाची गुणवत्ता चांगली राखावी, औषधी वनस्पतींच्या झाडांची लागवड करावी, रेस्न्यू सेंटरची निर्मिती करावी अशा सुचना आमदार नाईक यांनी वन अधिकार्यांना केल्या. विकास निधीतून होणार्या कामाची गती वाढविण्याचे निर्देशही त्यांनी अधिकार्यांना केले.
सुलाईदेवी पर्यटन स्थळाच्या पाहणीदौर्याप्रसंगी स्थानिक आदिवासी बांधवांनी आमदार संदीप नाईक यांच्याशी संवाद साधला. या ठिकाणी आमदार नाईक यांच्या विकास निधीतून विद्युतदिवे बसविण्यात येणार आहेत. आदिवासी बांधवांच्या वस्तीना पाणी, स्वच्छतागृह, विद्युत पुरवठा, औषधोपचार आदी आवश्यक सुविधांची पुर्तता करण्याची निर्देश आमदार नाईक यांनी पालिकेच्या अधिकार्यांना दिले. या भागाचे सर्व्हेक्षण सुरु करुन आदिवासींसाठी स्वतंत्र घरकुल योजना राबविण्याची प्रक्रिया सुरु करण्यास पालिका अधिकार्यांना सांगितले.
आमदार संदीप नाईक हे महापालिकेच्या स्थायी समितीचे सभापती असतानाच या दोन्ही स्थळांचा पर्यटनाच्या दृष्टीने विकास होण्यासाठी पालिकेच्या अर्थसंकल्पात हेड तयार करण्यात आला होता. गणेश नाईक पालकमंत्री असताना जिल्हा नियोजन समितीमध्ये विषय मांडून गवळीदेव साठी 30 लाख रुपयांचा निधी आमदार नाईक यांनी मंजूर करुन घेतला होता. या निधीतून या ठिकाणी पायर्या बसविण्यात आल्या आहेत.
गवळीदेव परिसरात बांबूंच्या विविध जातींचे वन निर्माण करावे, अशी सुचना आमदार संदीप नाईक यांनी वन अधिकार्यांना केली. वन खात्याने ग्रीन होप सारख्या संस्थेची याकामी मदत मागितली तर आम्ही ती आनंदाने देवू, असेही आमदार नाईक म्हणाले. हे बांबूंचे वन विद्यार्थ्यांसाठी आणि वन प्रेमींसाठी अभ्यासाचे एक ठिकाण होईल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.
**** एज्युटेनमेंट, एन्टरटेनमेंट आणि एन्व्हायरनमेंट
गवळीदेव आणि सुलाईदेवी ही दोन्ही ठिकाणे नवी मुंबईकरांसाठी धार्मिक आणि भावनिक ठिकाणे आहेत. या दोन्ही पर्यटन स्थळांचे सर्व्हेक्षण करुन त्यामधील वन्यजीव आणि वनस्पतींची माहिती संकलित करण्याची सुचना वन अधिकार्यांना केली आहे. एज्युटेनमेंट, एन्टरटेनमेंट आणि एन्व्हायरनमेंट या तीन्ही विषयात ही पर्यटनस्थळे विद्यार्थी, वनप्रेमी तसेच अभ्यासकांसाठी उपयुक्त ठरावीत. मनोरंजन होताना येथील पर्यावरणाला कोणत्याही प्रकारची बाधा होता कामा नये तसेच कोणत्याही प्रकारचे प्रदुषण वाढता कामा नये. ही दोन्ही ठिकाणे आपली संपत्ती असून नवी मुंबईकरांच्या भविष्यातील पिढयांसाठी हा ठेवा आपण जतन केला पाहिजे.
– आमदार संदीप नाईक