हरेश साठे
पनवेल : तरघर आणि मोहा येथील कार्यकर्त्यांनी गावांच्या विकासाची भुमिका घेवून भाजपामध्ये प्रवेश केला आहे, त्यामुळे या कार्यकर्त्यांच्या ताकदीने येथे पक्षाला अधिक बळकटी मिळेल, असा विश्वास माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी आज येथे व्यक्त केला.
पनवेल तालुक्यातील तरघर व मोहा येथील कॉंग्रेसच्या शेकडो कार्यकर्त्यांनी आज (बुधवारी ) भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर प्रवेश केला. पनवेल शहरातील मार्केट यार्ड येथे झालेल्या पक्ष प्रवेशाच्या कार्यक्रमात माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते त्यांना शाल परिधान करून भाजपात प्रवेश देण्यात आला.
त्यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी ज्येष्ठ नेते अरूणशेठ भगत, माजी जिल्हा परिषद सदस्य संजय पाटील, युवा नेते दशरथ म्हात्रे, पंडित म्हात्रे, के.एस.कोळी, शरद खारकर, नरेश पाटील, विलास फडके आदी मान्यवर उपस्थित होते.
लोकनेते रामशेठ ठाकूर पुढे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रात तर राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सर्वसामान्य जनतेच्या हिताचे निर्णय घेवून विविध महत्वकांक्षी योजना राबवित आहेत. याचा फायदा देशाच्या विकासाला मोठया प्रमाणात होणार आहे, असे सांगून विविध पक्षातील कार्यकर्त्यांचा सातत्याने भाजपात प्रवेश होत असताना आज तरघर व मोहा येथील कार्यकर्त्यांनीही पक्षात प्रवेश केला. हा चांगला निर्णय या कार्य
कर्त्यांनी घेतला असून त्यांचे प्रश्न सोडविण्याची जबाबदारी आमची आहे, असेही लेाकनेते रामशेठ ठाकूर यांनी सांगितले.
तरघर येथील कॉंग्रेसचे डॅशिंग कार्यकर्ते मनोहरशेठ ओवळेकर, पांडुशेठ ओवळेकर, अशोक मढवी, विठठलशेठ ओवळेकर, शंकर मोहिते, अंकुश वाजेकर, बाळाराम मोहिते, जनार्दन मढवी, उल्हास पारगावकर, मेघनाथ वाजेकर, संदीप वाजेकर, धिरज ओवळेकर, धर्मा ओवळेकर, जयेंद्र कोळी, नाथा ओवळेकर, सुरज ओवळेकर, नर्मदा ओवळेकर, सागर मढवी, शशिकांत कोळी, सचिन ओवळेकर, रविंद्र पारगावकर, चैताली खारकर, सचिन कोळी, रूपाली मढवी, महादेव ओवळेकर, अनंत वाजेकर, भरत म्हात्रे, ऋषिकेश ओवळेकर, विकास मोकल, अमिर मोहिते, विक्रांत ओवळेकर, भास्कर भोईर, करण कोळी, आतिश कोळी, पवन राठोड, वृषाल ओवळेकर, राजेश ओवळेकर, कुंदन म्हात्रे, रचना मढवी, रूपाली मढवी, निवृत्ती आवळेकर तर मोहा येथील चंद्रकांत कोळी, नरहरी कोळी, दत्तात्रेय भगत, महादेव कोळी, मोतीराम कोळी, नामदेव कोळी, विठ्ठल कोळी, भास्कर कोळी, आप्पा कोळी, विष्णू वाघिलकर, जगदिश कोळी, नितेश कोळी, राहुल कोळी, जगन्नाथ भगत, कृष्णा कोळी, गजानन कोळी, किशोर कोळी, बाळाराम कोळी, स्वप्निल कोळी, दिनानाथ कोळी, जयेंद्र कोळी, बेबीबाई कोळी, शेवंती कोळी, राधाबाई कोळी, जयश्री कोळी, आरती कोळी, भारती कोळी, जागृती
कोळी, पोर्णिमा कोळी, कमला कोळी, सुरेखा कोळी, सुमन कोळी, रमाकांत कोळी, योगेश कोळी, समाधान कोळी, सुनिल कोळी, गजानन कोळी, बळीराम कोळी, सुगंधा कोळी या कार्यकर्त्यांनी त्यांच्या समर्थकांसह भाजपामध्ये जाहीर पवेश केला.