सुजीत शिंदे : 9619197444
नवी मुंबई : सीबीडी प्रभाग क्र. 103 मधील दुर्गामाता नगर, संभाजी नगर आणि जय दुर्गामाता नगर या झोपड़पट्टी बहुल भागात राहणार्या नागरिकांना पायाभुत नागरी सुविधा पुरवणार असल्याचे सुतोवाचक स्थानिक नगरसेविका तथा समाजकल्याण व झोपड़पट्टी सुधार समितीच्या नवनिर्वाचित सदस्या सुरेखा अशोक नरबागे यांनी केले आहे.
10 जुलै रोजी संपन्न झालेल्या नवी मुंबई मनपाच्या महासभेत नगरसेविका सुरेखा नरबागे यांची समाजकल्याण व झोपड़पट्टी सुधार समितीच्या सदस्य पदी नियुक्ती करण्यात आली. प्रभाग क्र. 103 मधील झोपड़पट्टी बहुल भागात दैनंदिन गरजेच्या पायाभुत सुविधा पुरविण्यासोबतच या भागात स्वच्छ्ता राखणे,अंतर्गत भागात सिमेंट काँक्रीटचे पक्के रस्ते तयार करणे, आधुनिक शौचालयाची उभारणी करणे, दुर्गामाता नगर येथील वसाहत पर्यंत वाहने जाण्यासाठी डांबरी रास्ता तयार करणे, मलनिस्सारण व्यवस्था मजबूत करणे यांसारख्या बाबींवर भर दिला जाणार असल्याचे नगरसेविका सुरेखा नरबागे यांनी स्पष्ट केले आहे.