नवी दिल्ली : आगामी श्रीलंकेतील कसोटी मालिकेसाठी ज्या वेगवान मार्याची निवड केली आहे. तो मर्यादीत षटकातील भारताच्या वेगवान मार्यापेक्षा वेगळा आहे आणि समर्थही आहे असे संघ निवडीनंतर निवड समितीचे अध्यक्ष संदीप पाटील म्हणाले.
हरभजन सिंहच्या निवडीबद्दल बोलताना पाटील म्हणाले की, संघामध्ये स्थान मिळवण्यासाठी वय हा निकष असू शकत नाही पण कामगिरी आणि तंदुरुस्ती महत्वाची ठरते.
तुम्ही संघात चार वेगवान गोलंदाज निवडले आहेत पण धोनी नेहमी संघात चार वेगवान गोलंदाज खेळवण्यावर टीका करतो यावर पाटील म्हणाले की, आमचा नेहमीच संघात संतुलन ठेवण्याचा प्रयत्न असतो. श्रीलंकेतील खेळपट्ट्या पाहता निवडलेले गोलंदाज हा चांगला वेगवान मारा ठरु शकतो.