नवी मुंबई : आषाढी एकादशीनिमित्त सोमवार, दि. २६ जुलै रोजी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष प्रभाग ८५ व ८६च्या वतीने नेरूळ सेक्टर ६ येथील जय दुर्गा माता भाजी मंडई मैदानात विठ्ठल दर्शन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती कोलवाणी माता मित्र मंडळाचे अध्यक्ष मनोज यशवंत मेहेर यांनी दिली.
विठ्ठल दर्शन सोहळ्यानिमित्त सकाळी ७ ते रात्रौ १० वाजेपर्यत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमात लोकनेते गणेश नाईक, ठाण्याचे माजी खासदार संजीव नाईक, महाराष्ट्राच्या राजकारणात नवी मुंबईचे ओबामा म्हणून ओळखले जाणारे ऐरोलीचे युवा आमदार संदीप नाईक, महापौर सुधाकर सोनवणे, माजी महापौर सागर नाईक आदी मान्यवर सहभागी होणार आहेत.
सकाळी ७ वाजता श्री. पाडूंरंगाच्या मुर्तीची ब्राम्हणाद्वारे विधीवत पुजा व अभिषेक केला जाणार असून सकाळी ८ ते रात्री १० पर्यत विठ्ठल दर्शन सोहळ्यासह फराळ वाटपाचा कार्यक्रम ठेवण्यात आला आहे. सांयकाळी ६ ते रात्री १० या वेळेत संगीत सध्या हा सुमधुर भजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
नगरसेवक सुरज पाटील, प्रभाग ८५च्या नगरसेविका सौ. सुजाता सुरज पाटील, प्रभाग ८६च्या नगरसेविका सौ. जयश्री एकनाथ ठाकूर हे या कार्यक्रमाचे संयोजक असून या कार्यक्रमात सारसोळेच्या ग्रामस्थांनी व नेरूळ सेक्टर ६ मधील रहीवाशांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन कोलवाणी माता मित्र मंडळाचे अध्यक्ष मनोज यशवंत मेहेर यांनी केले आहे.