*वसई-विरार प्रेस क्लब ची अनोखी मागणी
ठाणे : पत्रकारांना संरक्षण देणारा कायदा पास करण्यासंबधात कोणताही राजकीय पक्ष उत्सुक नाही.दिवसागणिक पत्रकारांवर हल्ले वाढतच आहेत. आता तर हत्या करण्यापर्यंत मजल गेली आहे समाजकंटकांची लोकशाहीचा चौथा स्तंभ असणारा पत्रकार मात्र समाजकंटकांचा मार खावुन स्वत:चा जिव गमवतच आहे. त्यामुळे संपुर्ण राज्यात पत्रकार संरक्षण कायदा पास करा ही मागणी जोर धरत आहे. परंतु कोणताही राजकीय पक्ष किंवा सरकार याला गांभिर्याने घेत नाही. आणखी किती बळी जाण्याची वाट सरकार पाहणार आहे. जर सरकारला पत्रकारांना संरक्षण देणारा कायदा पास करायचा नसेल तर झालेल्या हल्याचे गुन्हे दाखल करुन पोलिसांचा वेळ वाया घालण्यापेक्षा पत्रकारांना मारहाण करणार्यांना तरी संरक्षण देणारा कायदा पास करा या मागणीसाठी ‘द प्रेस क्लब ऑफ वसई-विरार’ या संघटनेच्या वतीने मुंबईच्या आझाद मैदानावर ‘बनियन धरणे’ आंदोलन करण्यात आले.