सुजित शिंदे : 9619197444
नवी मुंबई :- जुईनगर रेल्वे फाटकानजीक रेल्वेचा कर्मचारी नसल्याने कारशेडकडे ये-जा करणार्या रेल्वेने अपघात घडण्याच्या अथवा वाहतुक कोंडी होण्याच्या घटना नेहमीच घडत असतात. शनिवारी (दि. 8 ऑगस्ट) रात्री 9.40 वाजण्याच्या सुमारास रेल्वे रूळ ओंलाडणार्या होंडा सिटी गाडीला रेल्वे पटरीवर रेल्वेने धडक दिल्याने अपघातात एक महिला गंभीर झाल्याची घटना घडली आहे.
जुईनगर रेल्वे फाटकाजवळ कारशेडकडे ये-जा करणार्या रेल्वेना मार्गदर्शन करण्यासाठी अथवा वाहतुकीचे नियत्रंण करण्यासाठी रेल्वेचा कर्मचारी बर्याच वेळा उपलब्ध नसतो. त्यामुळे अनेकदा किरकोळ अपघातही घडले आहेत. शनिवारी रात्री सानपाड्याहून जुईनगरकडे जाणार्या दिशेने रेल्वे रूळ ओंलाडणार्या होडा सिटी गाडीला कारशेडकडे जाणार्या रेल्वेने धडक दिली. या अपघातात होडा सिटी गाडीमध्ये मागील सिटवर बसलेल्या महिलेला गंभीर दुखापत झाली असून त्या महिलेला उपचारासाठी रूग्णालयात तातडीने हलविण्यात आले. यावेळी रेल्वेचा कर्मचारी फाटकापासून बर्याच अंतरावर लांबवर असल्याचे निदर्शनास आले. रेल्वेने रूळावरून जाणार्या होडा सिटीला धडक दिल्याने रस्त्यावर तणावाचे वातावरण निर्माण झाले. बघ्यांनी संतप्त होत रेल्वे अडवून ठेवली, त्यामुळे लांबवर वाहतुक कोंडीही झाली. रेल्वे फाटक क्रॉसिंग करताना धडक देणार्या रेल्वे चालकावर व पटरीनजिक देखरेख ठेवणार्या संबंधित कर्मचार्यांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी जुईनगरवासियांकडून करण्यात येत आहे.
या ठिकाणी रेल्वे पटरीवरून वाहनांना व अथवा जुईनगरवासियांना ये-जा करताना जीव मुठीत ठेवूनच वावरावे लागत असल्याने रेल्वेने या ठिकाणी फाटक बसविण्याची व कर्मचारी उपलब्ध करून देण्याची मागणी आमदार संदीप नाईक यांनी केली असून आपण याप्रकरणी रेल्वे मंत्रालयाकडे पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले.