संजय बोरकर : 9869966614
नवी मुंबई : शिवसेनेचे नेरूळ नोडमधील प्रभाग 97 मधील नगरसेवक काशिनाथ पवार यांनी पाच दिवसीय आधार कार्ड शिबिराचे आयोजन केले असून सोमवार, दि. 10 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता या शिबिराचा शुभारंभ होत आहे.
शिवसेना नगरसेवक काशिनाथ पवार यांनी 10 ऑगस्ट ते 14 ऑगस्ट या कालावधीत हे आधार कार्ड शिबिर आयोजित केले असून सकाळी 10 ते सांयकाळी 5 या वेळेत हे शिबिर घेण्यात येणार आहे. या शिबिरात आधार कार्ड काढू इच्छिणार्यांनी आपल्यासमवेत येताना पॅन कार्ड, रेशन कार्ड, लाईट बील, ड्रायव्हिंग लायसन्स, मतदार ओळखपत्र आदी कागदपत्रे आणावीत असे नगरसेवक काशिनाथ पवार यांनी विभागातील नागरिकांना सांगितले आहे. प्रभाग 96 व 97 मधील रहीवाशांकरता या शिबिराचे आयोजन केले असून रहीवाशांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन नगरसेवक काशिनाथ पवार यांनी केले आहे.