** खासदार राजन विचारे यांच्या महापालिका अधिकार्यांना सूचना
भाईंदर : खासदार राजन विचारे यांनी मीरा- भाईदर शहराला भेट देवून मीरा-भाईंदर शहरातील धोकादायक इमारती, महानगर गॅसची जोडणी, टाटा व रिलायन्स या विद्युत पुरवठा करणार्या कंपन्याकडून नागरिकांची विद्युत बिलातून होणारी पिळवणूक थांबवावी तसेच भाईंदर पूर्व-पश्चिम जोड़णारा सब वे आदी कामांसंदर्भात त्यांनी आज दुपारी मीरा-भाईंदर पालिका मुख्यालयात संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकार्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीत इमारती धोकादायक ठरवून पाडण्याचे षडयंत्र महापालिकेच्या अधिकार्याकडून होत असल्याचे निदर्शनास आले. त्यावर याची चौकशी करण्याचे आदेश खासदार राजन विचारे यांनी दिले
एखादा विकासक तसेच इमारतीत राहणार्या काही पदाधिकार्यांना हाताशी धरायचे आणि पालिकेंने दिलेल्या अमर्याद अधिकाराखाली सुस्थितितील इमारत धोकादायक ठरवून आपले उखळ पांढरे करायचे. हा प्रकार मीरा भाईंदर शहरात सुरु असल्याने हा प्रकार थांबवा लोकांच्या जीवाशी खेळू नका त्यांना बेघर करू नका असा सल्ला खासदार राजन विचारे यांनी महानगरपालिका अधिकार्यांना दिला. त्यामुळे जबरस्तीने बेघर केल्या जाणार्या मीरा-भाईंदरवसियांना दिलासा मिळनार आहे.
नुकताच झालेल्या नौपाडा परिसरातील कृष्णा निवास या इमारतीच्या झालेल्या दुर्घटनेबाबत ठाणे नवी मुंबई आणि मीरा-भाईंदर शहरातील क्लस्टर योजना राज्य शासनाकडून लवकरात लवकर अमलात आणावी यासाठी केंद्रामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेवून त्यांना निवेदन देण्यात आले. मीरा-भाईंदर शहरातील धोकादायक इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडीट व्ही.जे.टी.आय. आणि आय.आय टी. सारख्या शासनमान्य संस्थेला देणे सक्तीचे करावे व अहवाल प्राप्त झाल्यावरच संबंधित इमारत धोकादायक ठरवून मगच ती पाडण्यात यावी, असे असा सल्ला महानगरपालिका अधिकार्यांना दिला .
तसेच मीरा-भाईदर या शहरांना विद्युत पुरवठा करणार्या टाटा व रिलायन्स कंपन्याकडून बिलातून वसूल होणारी रक्कम कमी व्हावी या उद्देशाने शहरामध्ये एकच कोणती तरी कंपनी अमलात आणावी जेणे करून शहरात रस्ते खोदण्याचे काम कमी होऊन नागरिकांची वेळोवेळी होणारी असुविधा कमी होईल व भाईंदर पूर्व-पश्चिम यांना जोडणारा जेसल पार्क येथील सब वे ची पाहणी करण्याकरिता गेले असता या मायक्रो टनेलिंग पद्धतीने सुरु असलेल्या 75 मीटर लांबीचा सबवे चे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देश संबंधितांना दिले. हा सब-वे मे 2016 पर्यंत पूर्ण केला जाईल असे ठोस आश्वासन महापालिकेच्या अधिकार्यांनी खासदार राजन विचारे यांना दिले यावेळी उपमहापौर प्रवीण पाटील ,उपजिल्हाप्रमुख प्रभाकर म्हात्रे , शहरप्रमुख संदीप पाटील, धनेश पाटील, प्रशांत पालांडे ,माजी शहरप्रमुख मनोज मयेकर, शहर संघटक वैशाली खराडे, नगरसेवक जयंती पाटील, धनेश पाटील ,तारा घरत, शुभागी कोटियन, प्रणाली पाटील ,जयमाला पाटील, अनिता परमार ,मंदाकिनी गावंड, महापालिकेचे सहायक नगररचनाकार दिलीप घेवारे ,बांधकाम उप अभियंता नितीन मुकणे , नाणे गावकर ,राठोड ,प्रभाग अधिकारी बोरसे ,शिरवळकर, सर्वेअर ,विनोद नाईक ,महानगर गॅस लिमिटेडचे प्रोजेक्ट मॅनेजर अशरफ खान, रिलायन्सचे मॅनेजर गीगे,लाड ,टाटाचे मॅनेजर जोशी , डी.एस.पाटील व ओम प्रकाश गाडोदिया तसेच शिवसैनिक उपस्थित होते.