नवी दिल्ली – लोकप्रिय सोशल नेटवर्किंग साईट फेसबुकमध्ये इंटर्नशिप करणार्या भारतीय वंशाच्या विद्यार्थ्याने फेसबुकच्या सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटी दर्शविणारी ऍप तयार केल्याने त्याच्यावर कारवाई करत फेसबुकने त्याची इंटर्नशिप रद्द केली आहे.
हार्वर्ड विद्यापीठ शिकणारा अरण खन्ना नावाचा विद्यार्थी फेसबुकमध्ये इंटर्नशिप करत होता. इंटर्नशिपच्या दरम्यान त्याने तीन महिन्यांपूर्वी एक ऍप तयार केले. मारायुडेस् मॅप नावाच्या या ब्राऊजर ऍपचा उपयोग फेसबुक मेसेंजरद्वारे मेसेज पाठविणार्या युजरचा नेमका ठावठिकाणा दाखविण्यात येतो. फेसबुक मेसेंजर ऍपद्वारे मेसेज पाठविणार्या युजर्सचा ठावठिकाणा ज्याला मेसेज मिळतो त्याला आपोआप समजत असल्याचे तीन वर्षांपूर्वीच फेसबुकला अवगत करून देण्यात आल्याचे एका अहवालात म्हटले आहे. दरम्यान यामुळे युजरच्या खाजगी सुरक्षिततेबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. अरणने आपल्या ऍपबद्दल 26 मे रोजी ट्विटद्वारे माहिती दिली. काही वेळातच ही माहिती सोशल मिडियावर व्हायरल झाली. ही गोष्ट फेसबुकच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी अरणला दिलेली इंटर्नशिप परत घेतली आहे. तसेच फेसबुकच्या वेबआवृत्तीवरील ठावठिकाणा दाखविणारी सुविधा बंद केली आहे. त्यामुळे अरणची ऍपवर निरुपयोगी ठरणार आहे. मात्र त्यापूर्वीच दरम्यान ही ऍप 85 हजार वेळा डाऊनलोड करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
फेसबुकचा हा अनुभव अरणने हार्वर्ड जर्नल ऑफ टेक्नॉलॉजी सायन्स या नियतकालिकात प्रसिद्ध केला आहे. कोणत्याही हेतूशिवाय युजरचा ठावठिकाणा शेअर करणे हा युजरच्या खाजगी सुरक्षिततेचा भंग आहे किंवा नाही हे युजरने ठरवावे असेही त्याने म्हटले आहे. दरम्यान हा अनुभव माध्यमांपर्यंत पोचवू नका अशी सूचना फेसबुकने अरणला केली होती. तर अरणने फेसबुक कशाप्रकारे युजरची माहिती वापरतो हे दाखविण्यासाठी ही ऍप तयार केल्याचे म्हटले आहे.