* सामुहिक राष्ट्रगीताने अनोखी मानवंदना
गणेश पोखरकर
कल्याण : राष्ट्रभिमान व्यक्त करण्यासाठी 52 सेकंद सामुहिक राष्ट्रगीताचा जयघोष करूया आणि स्वातंत्र्य दिन साजरा करूया असे आवाहन भाजपाचे प्रदेश सचिव आमदार नरेंद्र पवार यांनी कल्याणकरांना केले होते. या आवाहनाला कल्याणकरांनी उस्फुर्त प्रतिसाद देत शहरातील शेकडो चौका चौकांमध्ये, राह्वासी संकुलाच्या प्रांगणात, मैदाने आदी ठिकाणी सामुहिक राष्ट्रीगीताचा जयघोष करून एकमेकाला स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या. कल्याण शहरात अगदी अनोख्या पद्धतीने प्रथमच स्वातंत्र्यदिन साजरा झाल्यामुळे आमदार नरेंद्र पवार यांचा 52 सेकंद देशासाठी हा अनोखा उपक्रम सगळ्यांच्याचं कौतुकाचा विषय बनला.
देशाला स्वातंत्र्या मिळताना अनेक क्रांतिकारकांनी बलिदान दिले होते. त्यांच्या शौर्याचे स्मरण ठेवण्यासाठी आणि राष्ट्रि्भमान व्यक्त करण्यासाठी, कल्याणकरांनी किमान 52 सेकंद देण्याचे आवाहन करीत आमदार पवार यांनी शहरवासीयांना कोडयात केले होते. 52 सेकंदाचे कोडे घातल्यामुळे उत्तर शोधण्यासाठी नागरीकांची उत्सुकता अगदी शिगेला पोहचली होती. मात्र हे 52 सेकंद सामुहिक राष्ट्रगीताचा जयघोष करून राष्ट्रभिमान व्यक्त करण्यासाठी एकत्र येण्याचे नागरीकांना समजल्यावर, सगळ्याच स्थरातून या उपक्रमाचे कौतुक झाले. हा उपक्रम शनिवारी 15 ऑगस्ट रोजी कल्याण जिल्ह्याचे भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या उपस्थित कल्याण शहराबरोबरच उंबर्डेगाव, सापर्डेगाव, मांडा, मोहाने, आटाळी आणि टिटवाळा आदी विभागात तब्बल 56 ठिकाणी राबविण्यात आला. या अभूतपूर्व सोहळ्याची सुरुवात सकाळी 9.00 च्या ठोक्याला आमदार नरेद्र पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत कल्याण पश्रि्चमेतील खडकपाडा चौकातून झाली. यावेळी नागरीक, भाजपाचे कल्याण जिल्ह्याचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. यांनतर कल्याण भाजपा जिल्हा आयोजित सामुहिक राष्ट्रगीत गायन कार्यक्रमामधील वासुदेव बळवंत फडके मैदान, योगीधाम, गौरी पाडा, अहिल्याबाई चौक, शिवाजी चौक, पारनाका आणि बेतूरकर पाडा परिसरातील आदी कार्यक्रमाला आमदार पवार यांनी उपस्थिती लावली. त्याचप्रमाणे नागरीकांनी देखील आमदार पवार यांच्या उपक्रमाला सकारात्मक प्रतिसाद देत शहरातील अनेक विभागात सामुहिक राष्ट्रगीताचा जयघोष केला. यामध्ये शाळकरी मुले, ज्येष्ठ नागरीक, तरुण, महिला आणि सेवाभावी संस्थांनी उस्फुर्त सहभाग घेतला. कल्याण शिवाजी चौक येथे ढोल ताशांची मानवंदना देऊन तसेच योगीधाम येथे शालेय विद्यार्थ्यांनी ब्रास ब्यांड पथकांनी मानवंदना देऊन राष्ट्रगीत म्हणण्यात आले. तर काही ठिकाणी नागरीकांनी राष्ट्रगीत गायन केल्यानंतर साखर आणि मिठाई वाटून स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्या दिल्या.
दरम्यान या कार्यक्रमाची सांगता कल्याण पश्रि्चमेतील न्युमानिषा नगर – बेतूरकर पाडा येथे दुपारी 11.30 च्या सुमारास झाली. या ठिकाणी सामुहिक राष्ट्रगीत गाऊन झाल्यानंतर नागरीकांसाठी राबविल्या जाणार्या मोफत वैद्यकीय शिबिराचे उद्घाटन आमदार पवार यांच्या हस्ते करण्यात आले. या शिबिराचे आयोजन भाजपा महिला कार्यकर्त्या निर्मलाताई वायले यांच्यावतीने करण्यात आले होते. हा अनोखा उपक्रम यशस्वी करण्यासाठी नगरसेविका उपेक्षा भोईर, नगरसेविका डॉ. शुभापाध्ये, भाजपा ज्येष्ठ नेते राजाभाऊ पातकर, देवानंद भोईर, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष रवी गायकर, भाजपा कल्याण शहर अध्यक्ष अर्जुन भोईर, भाजपा महिला आघाडी अध्यक्षा संजीवनीताई पाटील, युवामोर्चा अध्यक्ष गौरव गुजर, पंकज वीर सर आणि भाजप पदाधिकारी – कार्यकर्ते आदींनी विशेष मेहनत घेतली.
******
चौकट :- भाजपा विद्यार्थी आघाडीकडून स्टेशन परिसरात सुमारे 5000 हजार तिरंगा ब्याच लावून नागरीकांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. यामध्ये प्रवासी, रिक्षाचालक, वाहतूक पोलीस, रेल्वे पोलीस आदींना तिरंगा ब्याच लावून युवक आणि युवतींनी स्वातंत्र्यदिन साजरा केला. याठिकाणी देखील सामुक राष्ट्रगीताचे गायन झाले. या कार्यक्रमाचे आयोजन भाजपा विध्यार्थी आघाडीचे शहरअध्यक्ष सागर तळेकर यांनी केले होते. त्यांच्यासमवेत विध्यार्थी आघाडीचे पदाधिकारी आतोष कुबाळे, आशिष घोरपडे, आरती देशमुख, किरण भोसले, भूषण पाटील, कुणाल शेलार आदी उपस्थित होते.