* इको जॉगिंग ट्रॅक साकारणार
* जेटटी येथे हायमास्ट
नवी मुंबई : आमदार संदीप नाईक यांच्या आमदारनिधीतून आज स्वातंत्र्यदिनी ऐरोलीमध्ये दोन महत्वपूर्ण नागरी सुविधा कामांचा शुभारंभ करण्यात आला.
ऐरोली विधानसभा मतदारसंघात पर्यावरणपुरक वातावरण वृध्दीगत व्हावे, यासाठी आमदार संदीप नाईक यांनी यशस्वी प्रयत्न केले आहेत. त्यांच्या आमदारनिधीतून सेक्टर 14 येथे पहिला इको जॉगिंग ट्रॅक ऐरोलीत साकारला आहे. हा जॉगिंग ट्रॅक जेथे संपतो, तेथपासून पुढे ऐरोली डी मार्ट्र जवळ नविन जॉगिंग ट्रॅक होणार असून त्याच्या कामाचा शुभारंभ आमदार नाईक यांच्या हस्ते आज पार पडला.
ऐरोली जेट्टी येथे आगरी-कोळी बांधवांसाठी हायमास्ट दिवा बसविण्यात येणार आहे. त्यामुळै लवकरच हा परिसर प्रकाशाने उजळणार आहे. या हायमास्ट दिव्यामुळे जेटटी भागात कामानिमित्त येणार्या आगरी आणि कोळी बांधवांची रात्रीच्या वेळेस सुरक्षितता राखली जाणार आहे. जेटटी परिसरातील पर्यावरण आणि पक्षांच्या सुरक्षिततेची काळजी देखील घेण्यात येत असल्याने आमदार नाईक म्हणाले. नजिकच्या काळात ऐरोली जेट्टी परिसराचा विकास जागतिक दर्जाचे पर्यटनस्थळ म्हणून करण्याचा मानस आमदार नाईक यांनी याप्रसंगी व्यक्त केला. आमदार नाईक यांच्या हस्ते वृक्षारोपण करुन या प्रसंगी पर्यावरण संवर्धनाचा संदेशही देण्यात आला.
राष्ट्रवादी काँगे्रसचे शहराध्यक्ष अनंत सुतार, माजी नगरसेवक अशोक पाटील, नगरसेविका संगीता यादव, समाजसेवक नारायण शिंदे, पालिका परिवहन समितीचे सदस्य सुरेश पाल, प्रभाग समिती सदस्य दिपक पाटील, राष्ट्रवादी अल्पसंख्यांक सेलचे शहराध्यक्ष जब्बार खान, सिदरा खान, युवक अध्यक्ष जयेश कोंडे, पद्मजा केणी, हेमा सालियन आणि स्थानिक नागरिक या दोन्ही कार्यक्रमप्रसंगी मोठ्या संख्येने उपस्थित होते.