जकार्ता : जागतिक स्पर्धेत पदक मिळवण्याच्या निश्चयाने उतरलेल्या सायनाने आपला विजयरथ कायम ठेवला आहे.
उपांत्यफेरीत जागतिक क्रमवारीत 29 व्या स्थानी असलेल्या इंडोनेशियाच्या लिंडावेनी फनेत्रीवर विजय मिळवत सायनाने पहिल्यांदाच अंतिम फेरीत धडक मारल. स्वातंत्र्यदिनी सायनाने समस्त भारतीयांना विजयाची भेट दिली.
ऑलिंपिक पदक विजेत्या सायनाच्या या विजयामुळे तिचे या स्पर्धेत किमान रौप्यपदक निश्चित झाले आहेत. गेली पाच वर्षे या स्पर्धेत सायनाला पदकाने हुलकावणी दिली होती.
स्पर्धेतील विजयी आगेकूच कायम ठेवत सायनाने उपांत्यफेरीत इंडोनेशियाच्या लिंडावेनी फनेत्रीचा अवघ्या 55 मिनिटांत 21-17, 21-17 असा सरळ दोन गेममध्ये पराभव केला. दोनही गेममध्ये सायनाने आपले वर्चस्व कायम ठेवले.