मुंबई : ठाणे नवीमुंबई व मीरा भाईंदर या शहरातील टपाल कार्यालयानच्या झालेल्या दुर्रावस्थेबाबत व अपुरा कर्मचारी वर्ग व अपुरा साहित्य यामुळे टपाल कार्यालयात येणारे जेष्ठ नागरिक व निवृत्त वेतनधारक यांना होणार्या त्रासाबाबत ठाण्याचे खासदार राजन विचारे यांनी मुख्य पोस्ट मास्तर जनरल ए .के . दास महाराष्ट्र सर्कल व वरिष्ठ अधिकारी वर्ग यांच्या सोबत बैठक आयोजित केली होती या बैठीकीला नगरसेवक गिरीश राजे , पी. जी. एम मुंबई रिजनचे पी. एन. रणजीत कुमार, डायरेक्टर पोस्टल सर्विस मुख्यालय आदी उपस्थित होते.
या बैठकीत ठाण्यातील कोपरी व मीरा भाईंदर येथील टपाल कार्यालयाची झालेल्या दुरावस्तेबाबत काही छायाचित्र मुख्य पोस्ट मास्तर जनरल ए .के. दास यांना दाखवून त्यांना निवेदनही देण्यात आले, त्यानंतर झालेल्या चर्चेत खासदार राजन विचारे यांनी ठाणे शहराची लोकसंख्या 23 लाखापर्यंत गेली असताना 50 वर्षापूर्वी भाडेतत्वावर घेतलेल्या इमारती आता धोकादायक झाल्याने या धोकादायक इमारतीना ठाणे महानगरपालिकेने नोटीसा बजावून खाली करण्याचे आदेशहि देण्यात आले आहेत. परंतु या इमारतीचे मालक व यांच्या वयक्तिक वादामुळे या इमारतीच्या पुनर्बांधणी झाले नाही .त्यामुळे ठाण्यातील कोपरी येथील टपाल कार्यालयातील 25 कर्मचारी आपला जीव धोक्यात घालून काम करीत आहेत. तसेच या टपाल कार्यालयात दररोज येणारे सुमारे 200ते 250 जेष्ठ नागरिक व महिन्याच्या अखेरीस येणारे 1600 निवृतीवेतनधारक आपला जीव धोक्यात घालून पेन्शनसाठी येत असतात. पोस्टाची ही धोकादायक इमारत कोणत्याही क्षणी कोसळून दुर्घटना होण्याची शक्यता असल्याने तत्काळ ते विभागीय पोस्ट ऑफिस दुसर्या ठिकाणी स्थलांतरीत करण्यात यावे अशा सूचना देण्यात आले. तसे न केल्यास इमारत दुर्घटनेची पूर्ण जबाबदारी आपली असेल, असे खा. राजन विचारे यांनी मुख्य पोस्ट मास्तर जनरल ए .के. दास ठणकावले. त्यावर त्यांनी सदर इमारतीची पाहणी आपल्या उपस्थित करून पुढील 2 महिन्याच्या कालावधीत उचित कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले
त्याच बरोबर मीरा भाईंदर शहरासाठी 3 मुख्य कार्यालये असून भाईंदर पूर्व येथील टपाल कार्यालय धोकादायक झाल्याने हे टपाल कार्यालयही दुसरीकडे तत्काळ स्थलांतरीत करावे व या शहराची लोकसंख्या विचारात घेता त्या ठिकाणी सुरु असलेली टपाल सेवा हतबल झाली आहेत . तुटपुंज्या कर्मचारी वर्गामुळे लाबच लांब रांगा लागून काम होण्यास खूप विलंब होत असल्याने नागरिकांचे कर्मचारी यांचे बरोबर खटके उडत आहेत .कर्मचारी यांना बसण्यासाठी टेबल खूर्च्या नसल्याने ते खाली जमिनीवर बसूनच काम करीत आहेत विना विलंब विना तक्रार सेवा देण्यासाठी कर्मचारी वर्ग वाढविणे अत्यंत गरजेचे आहे खासदार राजन विचारे यांनी ए .के . दास यांना म्हंटले त्यावर त्यांनी 3000 कर्मचारी यांच्या भरतीवर हाय कोर्टाच्या नागपूर खंडपीठाने स्थगिती दिलेली होती ती आम्ही उठविलेली आहे या कर्मचारी भरतीबाबत प्रक्रिया लवकरच सुरु करू असे आश्वासन ए .के . दास यांनी दिले.
महापालिकेने पोस्टसाठी आरक्षित केलेले भूखंड विकत घेवून किंवा मूळ भूखंड मालकाकडून पोस्टाच्या नियमानुसार राखीव क्षेत्रावर बांधकाम करून घेऊन स्वतःच्या हक्कचे कार्यालय बांधून घ्यावे व भाडे तत्वावर सुरु असणारे कार्यालय बंद करावे अशा सूचना खासदार राजन विचारे यांनी दिल्या.