* 5700 विद्यार्थ्यांनी दिली राष्ट्रध्वजाला सलामी
नवी मुंबई : भाजपाच्या बेलापुरच्या आमदार सौ. मंदा विजय म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली व प्राईड ऑफ नेशन चे कासीम दस्थागिरी यांच्या माध्यमातून एनआरआय कॉलनी ते मोराज सर्कल सानपाडा दरम्यान 5500 मीटर लांबीचा भारताचा तिरंगा मानवी साखळीद्वारे फडकविण्यात आला. जवळपास 5700 विद्यार्थ्यानी राष्ट्रध्वजाला सलामी दिली.
महाराष्ट्र सरचिटणीस संजय उपाध्याय व आमदार सौ. मंदा विजय म्हात्रे यांनी तिरंगी फुगे आकाशात सोडून या कार्यक्रमाचे उद्घाटन केले. या कार्यक्रमाच्या दरम्यान भव्य संमेलन काढण्यात आले अनेक कलावंतानी पारंपारिक वेशभूषा परिधान करून नृत्य साधर केले. वाद्य वृद्धांचा अनोखा अविष्कार पहायला मिळाला. कोण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कोणी महात्मा फुले तर कोणी शिवाजी महाराज, अशे अनेक आगळे वेगळे कलाकृत करण्यात आले. विशेष म्हणजे या संमेलनात आमदार सौ. मंदा विजय म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थ्यानी पंतप्रधान नरेंद्र मोदिजी यांच्या सबका साथ सबका विकास, बेटी बचाव बेटी पाढव, एक कदम स्वच्छता कि और, पाणी बचाव अशे अनेक घोष वाक्याद्वारे नवी मुंबईकरांनी संदेश दिला.
महाराष्ट्र सरचिटणीस संजय उपाध्याय यांनी आमदार मंदा विजय म्हात्रे यांचे कौतुक करून नवी मुंबईला एक आदर्श आमदार मिळाल्याचे सांगितले. नवी मुंबई पालिका आयुक्त यांनी ही आ. मंदा विजय म्हात्रे यांचे शब्दात कौतुक केले. नवी मुंबईत प्रथमच आगळी वेगळी राष्ट्रभक्ती दिसून आली संपूर्ण पाम बीच मार्ग जणू राष्ट्र भक्तीच्या रंगाने निघाली होती. या कार्यक्रमात उपस्थित विध्यार्थ्यानी आणि शिक्षकांनी या कार्यक्रमाचे कौतुक करत आ. मंदा विजय म्हात्रे यांचे आभार मानले. या प्रसंगी उपस्थित महाराष्ट्र सरचिटणीस संजय उपाध्याय, सिडको व्यवस्थापकीय संचालक संजय भाटीया, पालिका आयुक्त दिनेश वाघमारे, नगरसेवक विजय चौगुले, भाजपचे नगरसेवक दीपक पवार, सुनील पाटील, रामचंद्र घरत, उषा पाटील, संपत शेवाळे, उज्वला झांजाड तसेच डॉक्टर राजेश पाटील, मारुती भोईर, गोपाळराव गायकवाड, भगवानराव ढाकणे, माजी नगरसेविका विजया घरात, विठ्ठल मोरे तसेच भाजपचे इतर कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.