माद्रिद : सिरिया आणि इराकमध्ये लढण्यासाठी इस्लामिक स्टेट म्हणजेच इसिस या दहशतवादी संघटनेसाठी भरती करत असल्याच्या संशयावरुन स्पेन आणि मोरोक्कोच्या पथकांनी संयुक्त कारवाई करत १४ जणांना अटक केली.
स्पेनच्या गृहमंत्रालयाने हि माहिती दिली. स्पेनची राजधानी माद्रिद आणि मोरोक्कोमध्ये विविध ठिकाणी धडक कारवाई करत १४ जणांना अटक करण्यात आली. जगातील अनेक देशातील जिहादी विचारांनी प्रेरीत झालेले तरुण इसिसकडून लढण्यासाठी सिरिया, इराक या देशांमध्ये जात आहेत.
इंटरनेटवरुन होणार्या इसिसच्या विषारी विचारांच्या प्रचाराकडे जगभरातून तरुण आकर्षित होत आहेत. इसिसमध्ये होणारी ही भरती रोखण्यासाठी जगातील विविध देश उपायोजना करत आहेत.