30 ऑगस्टला नवी मुंबई महापौर सार्वजनिक श्री गणेश दर्शन स्पर्धा 2015 पारितोषिक वितरण सोहळा
नवी मुंबई : महानगरपालिका क्षेत्रातील गणेशोत्सव मंडळांना प्रोत्साहीत करण्यासाठी दरवर्षी आयोजित केल्या जाणा-या नवी मुंबई महापौर सार्वजनिकश्रीगणेश दर्शन स्पर्धा 2015 चा पारितोषिक वितरण सोहळा या वर्षीच्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर 30 ऑगस्ट रोजी सायं. 4.30 वा. वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृहात महापौर सुधाकर सोनवणे यांच्या हस्ते संपन्न होत आहे. याप्रसंगी याप्रसंगी ठाणे लोकसभा सदस्य खा. राजन विचारे, बेलापूर विधानसभा सदस्य...









