कोरोनाचे सामाजिक भान जपणारा प्रसिध्दी विभागातील योध्दा प्रफुल्ल!
कर्तव्य दक्षता व सामाजिक जबाबदारीचे भान शासनात आल्यावर लगेच येते. याचे मुर्तीमंत उदाहरण म्हणजे विभागीय माहिती कार्यालयातील कर्मचारी प्रफुल्ल पाटील यांचे नाव घेता येईल. पाटील हे विभागीय माहिती कार्यालयात २७ जुलै २०१८ रोजी अनुकंपातत्वावर शिपाई या पदावर रुजू झाले. पाटील यांचे आई आणि वडील दोघेही हयात नसल्याने ते एकटेच राहतात. दोन्ही बहीणींची लग्न झाली आहेत. त्यांचा संसार आपापल्या सासरी सुखाने सुरु...







